राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी तिरंगा फडकावला, मात्र या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गैरहजर राहिले. यावरुन टीका होत असताना भाजपनं काँग्रेसच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा व्हिडिओ ट्विट करत गंभीर आरोप केला आहे. देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहण कार्यक्रमात वंदे मातरम गीत लावण्यात आले होते. त्यावेळी सोनिया गांधींनी ते थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे, मात्र काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणावेळी वंदे मातरम राष्ट्रीय गीत गाण्यात आले. गीत सुरु असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आणि इतर कार्यकर्त्यांना काहीतरी बोलताना दिसत आहेत.. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेही त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. तिन्ही नेत्यांमध्ये झालेला संवाद समोर आलेला नाही. पण, भाजपाकडून हा व्हिडीओ शेअर करत आरोप करण्यात आला. भाजपाचे प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी "वंदे मातरम गायले जात असताना सोनिया गांधी नाराज झाल्या आणि त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते थांबवण्यास सांगितले. वंदे मातरमबद्दल सोनिया गांधींना इतका द्वेष का आहे?" असा सवाल विचारला, तर भाजपा आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही यावर प्रश्न उपस्थित केला. मात्र काँग्रेसनं तातडीनं यावर स्पष्टीकरण दिले आहे आणि भाजपवर टीके केलीये.
#soniagandhi #rahulgandhi #congress #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment